Pune City News
राष्ट्रीय

बँका ‘एवढ्या’ दिवस राहणार बंद

देशातील सर्व सरकारी बँका मार्चचा अंतिम आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यांत ८ दिवस बंद राहणार आहेत. येत्या २७  मार्चपासून ते ३१  मार्चपर्यंत तसेच १ व २  एप्रिल आणि ४  एप्रिलला बँका विविध कारणांसाठी बंद राहणार आहेत. यामध्ये २७ मार्चला दुसरा शनिवार, २८  मार्चला रविवार, २९  मार्चला धूलिवंदन, ३०  मार्चला मार्च अखेर दिवस तर ३१ मार्चला सार्वजनिक व्यवहार बंद राहणार आहेत.

▪️ तसेच १  एप्रिलला अकाऊंट क्लोजिंगचा दिवस, २  एप्रिल दिवशी गुड फ्रायडे तर ४  एप्रिलला रविवार असल्याने सरकारी बँका बंद राहणार आहेत.

▪️ दरम्यान, २७ मार्च ते ४  एप्रिल दरम्यान केवळ दोनच दिवस बँकांचे कामकाज राहणार असून दोन्ही दिवसांत ग्राहकांची कामे होणार नसल्याने ५ एप्रिलची वाट पहावी लागणार आहे.

Related posts

श्रमिक चळवळीचा आधारवड कोसळला: डॉ. बाबा आढाव यांचे निधन

Vishal Khandagale

जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

Vishal Khandagale

कोरोना : जागतिक बँकेकडून “भारताला” निधी मंजूर!

Vishal Khandagale

Leave a Comment