Pune City News
कोरोनामहाराष्ट्र

महाराष्ट्रात संचारबंदी लागू; सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील

Pune City News:- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात आजपासून संचारबंदी लागू करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले :

▪ केवळ जीवनावश्यक वस्तू चालू राहतील. अन्नधान्य, औषधं, बेकरी, पशूखाद्य, पाळीव प्राणी दवाखाने सुरु राहतील.

▪ त्यासंबंधीची वाहतूक सुरु राहील. तसेच कृषी उद्योगाशी संबंधित दुकाने आणि वाहतूक सुरुच राहील. सांगूनही काही जण ऐकत नाहीत ते दुर्दैवी आहे.

▪ राज्यातील सर्व मंदिरंं, प्रार्थनास्थळ बंद ठेवावी. मंदिरांमध्ये केवळ पुजारी, मौलवी असतील. त्याशिवाय रेल्वे, बस आणि खासगी वाहनेही बंद करण्यात येणार आहे.

▪ जर आवश्यकता असेल तर चालक अधिक 2 आणि रिक्षामध्ये चालक अधिक 1 अशी परवानगी सर्व खासगी वाहनाला दिली आहे.

▪ बस, खासगी वाहनेही बंद, जर आवश्यकता असेल तर चालक अधिक 2 आणि रिक्षामध्ये चालक अधिक 1 अशी परवानगी आहे.

▪ वैद्यकीय क्षेत्रात स्टाफची गरज लागली तर आशा आणि अंगणवाडी सेविका, होमगार्ड्स यांना प्रशिक्षित करुन या सेवेसाठी तयार करणार आहे.

▪ सध्या कोरोनाच्या निर्णयाक टप्प्यावर आलो आहे. हीच ती वेळ आहे आता रोखू शकलो नाही तर जगभर थैमान घातलं आहे, तसंच ते महाराष्ट्रात घालेल.

Related posts

खराडी, चंदननगर व वडगावशेरी स्वयंस्फूर्तीने बंद!

Vishal Khandagale

पुण्यात निवडणुकीपूर्वी प्रचंड राजकीय घोळ : उमेदवारी, जागावाटप आणि पक्षांतर्गत अस्वस्थता

Reporter pune

विधान परिषदेचे 12 जागा साठी मोर्चेबांधणी ..!

Vishal Khandagale

Leave a Comment