Pune City News
कोरोनामहाराष्ट्र

सर्व EMI, वसुली तात्पुरती थांबवा, अशोक चव्हाण यांची पंतप्रधानांकडे मागणी

Pune City News:-: कोरोना विषाणू मुळे ठप्प झालेला व्यापार-उद्योग पाहता. केंद्र सरकारने रिझर्व्ह बॅंकेच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरुपात सर्व वित्तीय संस्थांच्या सर्व प्रकारच्या वसुलीला स्थगिती द्यावी. सर्व प्रकारचे कर्जाचे हप्ते, कॅश क्रेडिटचे व्याज, क्रेडिट कार्डांची बिले आदींचा भरणा तूर्तास स्थगित करावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी पत्र पाठवून राज्य शासनाने केंद्र सरकारला याबाबत शिफारस करावी, असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत. “कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व खासगी आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. परंतु, अद्याप कर्जांची वसुली, इएमआय, इन्स्टॉलमेंट्स, ऑटो डेबिट आदी बाबी थांबविण्यात आलेल्या नाहीत”,असंदेखील अशोक चव्हाण म्हणाले.

“आज शेतकरी, लहान-मोठे व्यापारी, उद्योजक, नोकरदार, कंत्राटी कर्मचारी, कामगार असे समाजातील सर्व घटक घरात अडकून पडले आहेत. बहुतांश लोकांकडे फारसे पैसे नाहीत. अत्यावश्यक सेवा म्हणून बॅंका भलेही सुरु असतील. पण उद्योग-व्यवसाय सारे ठप्प असल्याने पैशांची देवाणघेवाण थांबली आहे”, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला.

“कर्जाचे हप्ते, इन्स्टॉलमेंट भरायला लोकांनी पैसे आणायचे कुठून? हा प्रश्न आहे. एक जरी हप्ता चुकला तरी त्याचा ‘सिबिल’वर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे या मुद्याचा गांभीर्याने विचार करावा आणि सर्व वित्तीय संस्थांची, बॅंकांची सर्व प्रकारची वसुली तात्पुरती स्थगीत करावी. त्याचप्रमाणे जीएसटीची विवरणपत्रे आणि आयकर भरण्याची मुदत देखील वाढवून देण्यात यावी”, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली.

Related posts

राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाउन कायम !

Vishal Khandagale

कोरोना चा संसर्ग रोखण्यास “पुणे जिल्ह्यात सनियंत्रण आधीकारयाची नेमणूक”

Vishal Khandagale

चिनी “Rapid Antibodi test Kit’s” ऑर्डर रद्द!

Vishal Khandagale

Leave a Comment