Pune City News
Uncategorized

मातंग समाजाच्या मागण्यासाठी राज्यभर लढा उभारणार : रमेश बागवे

मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासह विविध मागण्या बऱ्याच वर्षापासून शासनाने प्रलंबित आहेत.

त्यासाठी आज(बुधवारी) मातंग एकता आंदोलनच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून तीव्र निदर्शने करण्यात आली.

त्यावेळी माजीमंत्री रमेश बागवे यांनी मातंग समाजाच्या मागण्यासाठी राज्यभर लढा उभारणार असल्याचे जाहीर केले.

मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण, लहुजी साळवे आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या. लोक शाहीर आण्णा भाऊ साठे महामंळाचे कर्ज माफ करावे, महामंडळाची तत्काळ पुनर्रचना करून चालू करावे, बार्ट्टी च्या धर्तीवर आर्ट्टीची स्थापना करावी,

संगमवाडी येथील क्रंतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक लवकरात लवकर सुरू करावे, आण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा,

अट्रोसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, चिरानगर येथील आण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभा करावे, कै.संजय ताकतोडे यांच्या कुटुंबियाना मदत करावी. यामागण्यासाठी मातंग एकता आंदोलनच्या वतीने आज तीव्र आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री व मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक रमेश बागवे यांनी केले.

Related posts

गर्व आहे… निर्भयाची आई गहिवरली!

Vishal Khandagale

श्रमिक चळवळीचा आधारवड कोसळला: डॉ. बाबा आढाव यांचे निधन

Vishal Khandagale

वाहन चालकांसाठी 01 ऑक्टोबरपासून नवे नियम

Vishal Khandagale

Leave a Comment