शहरात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढतांना पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर खा. शरद पवार यांनी पुण्यातील कोरोनास्थिती आटोक्यात आणण्यासाठी नियोजनाच्या बैठका घेत आहेत.
यावर मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी यासाठी पाऊले उचलण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार पुणे पोलिसांकडून याची अंमलबजावणी होताना दिसत आहे.
दोन दिवसांपासून पोलिसांकडून मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर, वाहन चालकांवर कारवाई करत दंड वसुल केला जात आहे. आज पर्यंत पुणे पोलिसांनी कारवाई करत २५ लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पुण्यात आता अनलॉक झाल्यापासून नागरिकांची बाहेर वर्दळ वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यात नागरिक मास्कचा वापर करताना दिसत नसल्याचे चित्र दिसत आहे.त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतांना दिसत आहे.
प्रशासनाच्या आदेशानंतर पोलिसांकडून मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असून दंडही वसूल करण्यात येत आहे.

