पुणे

येरवडा कारागृहातून पाच कैद्यांचे पलायन

PUNE CITY NEWS : येरवडा कारागृहातून मोकासह गंभीर गुन्ह्यातील पाच कै दयांनी आज ( गुरुवारी) पहाटे पलायन केले आहे. कारागृहाच्या खिडकीचे गज कापून या कैद्यांनी पलायन केले आहे.

देवगण अजिनाथ चव्हाण, गणेश आजिनाथ चव्हाण( दोघेही रा. बोरावके नगर, तालुका दौंड, पुणे), अक्षय कोडक्या चव्हाण, (रा. लिंगाळी माळवाडी, तालुका दौंड, पुणे), अजिंक्य उत्तम कांबळे (रा. सहकार नगर टिळेकर वाडी), सनी टायरन पिंटो(रा. काळेवाडी पेट्रोल पंपाच्या मागे, पुणे) अशी पळून जाणाऱ्या कैद्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी पहाटेच्या सुमारास येरवडा जात पडताळणी कार्यालयाच्या आवारामध्ये तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या कारागृहाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक ५ मधील खिडकीचे दोन गज उचकटलेले पोलिसांच्या लक्षात आले. त्यावरून पाच आरोपी पळून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या घटनेची माहिती मिळताच येरवडा कारागृहाचे अधीक्षक यु.टी. पवार, येरवडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, गुन्हा निरीक्षक अजय वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून अधिक तपास सुरू आहे.

Related posts

महापालिकेची गणेशोत्सवासंदर्भात तयारीचा आढावा बैठक

Vishal Khandagale

पुणे शहर भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकारयाचे नगरसेवक अरविंद शिंदे ना खुले पत्र !!

Vishal Khandagale

शहर गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदी श्रीनिवास घाडगे

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX