दिल्ली महापालिकेच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास आतापर्यंत 200 रुपये दंड आकारला जात होता.कोरोना विषाणूचा उद्रेक रोखण्याच्या उद्देशाने आता थुंकल्यास 2 हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम दंड म्हणून आकारली जाणार आहे.जर एखादी व्यक्ती हॉटस्पॉट,कंटेन्मेंट झोनमध्ये,किंवा बफर झोनमध्ये थुंकली,तर तिला तुरुंगवासही होऊ शकणार आहे.
पूर्व दिल्लीतील एका सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याप्रकरणी दिल्ली महापालिकेच्या सॅनिटरी अधिकाऱ्याने एका व्यक्तीविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.कोरोना विषाणूचा प्रसार थुंकीच्या माध्यमातून जलद गतीने होत असतो. हे लक्षात घेऊनच महानगर पालिकेने हे कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

