Pune City News
पुणेमहाराष्ट्र

घरभाडे वसुली तीन महिने पुढे…!

Pune City News:- घरभाडे दिले नाही म्हणून कोणालाही घराबाहेर काढू नये तसेच घरभाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी अशा सूचना गृहनिर्माण विभागाने दिल्या आहेत.

सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 23 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन असून लॉकडाऊन 3 मे पर्यंत राहणार आहे.या लॉकडाऊनमुळे सर्व बाजारपेठा , व्यावसायिक संस्था, कारखाने व एकूणच सर्व आर्थिक, व्यावसायिक हालचाली बंद आहेत.

याचाच सर्वसामान्य जनतेच्या रोजगारावरही परिणाम झालेला असून अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद झालेले आहेत.आशा कठीण अभूतपूर्व परिस्थितीमुळे सर्वसामान्य जनतेला कोरोनाच्या समस्येबरोबरच अत्यंत कठीण अशा आर्थिक अडचणींनाही तोंड द्यावे लागत आहे.

Related posts

मयुर कॉलनी ते पौड फाटा डी.पी. रस्ता लवकरच खुला ! -महापौर

Vishal Khandagale

पुण्यात निवडणुकीपूर्वी प्रचंड राजकीय घोळ : उमेदवारी, जागावाटप आणि पक्षांतर्गत अस्वस्थता

Reporter pune

कोरोना: 276 भारतीयांना कोरोनाची बाधा !

Vishal Khandagale

Leave a Comment