Pune City News
राष्ट्रीय

काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे रविवारी सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा रक्षकांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार, श्रीनगर येथील झदिबल आणि झूनिमर पोझवालपोरा या भागात दहशतवादी लपून बसल्याची खबर सुरक्षा रक्षकांना मिळाली होती.

त्यानुसार, सुरक्षा रक्षकांनी येथे शोध मोहिम सुरु केली. दरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला. त्याला आपल्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत.

दहशतवादी लपून बसल्याचे उघड झाल्याने श्रीनगर शहरातील इंटरनेट सेवा तात्पुरती खंडीत करण्यात आली आहे.

तसेच या लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधण्याासाठी सुरक्षा रक्षकांकडून शोध मोहीम अद्याप सुरु आहे. काश्मीर झोन पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

Related posts

एअर इंडियाच्या वैमानिकास कोरोना !

Vishal Khandagale

भारतीय हवाई दल प्रमुखांचं मोठं विधान…!

Vishal Khandagale

देशातील प्रवासी रेल्वे सेवा बंद !

Vishal Khandagale

Leave a Comment