Pune City News:- महाराष्ट्रात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. अशातच पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.४० डॉक्टरांना कोरोनाचा धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यात काही सर्जन आणि डॉक्टरांचा समावेश आहे. या सगळ्यांना मेडिकल कॉलेजमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे.
या डॉक्टरांनी एक रुग्णाची सर्जरी केली होती. या सर्जरीदरम्यान रुग्णाच्या काही टेस्ट केल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
तबलिगीच्या कार्यक्रमाला हजेरी या रुग्णाने आपली माहिती लपवल्यामुळे त्याचा मोठा फटका पुण्यातील डॉक्टरांना बसरणार आहे. हा रुग्ण दिल्लीतील निजामुद्दीन इथे पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला हजर होता.या रुग्णाचा एक अपघात झाला होता. त्यामध्ये इंटरनल ब्लिडिंग झाल्यामुळे त्याची सर्जरी करावी लागली होती. त्यानंतर दोन दिवस त्याला ताप येत होता.डॉक्टरांनी रुग्णाचा आईकडे या संदर्भात चौकशी केली त्यावेळी हा रुग्ण तबलिगी जमातच्या कार्यक्रमात हजर असल्याची माहिती समोर आली.डॉक्टरांनी या रुग्णाच्या काही टेस्ट केल्यानंतर शनिवारी त्याचा रिपोर्ट आला. या रिपोर्टमध्ये तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यानंतर त्याच्यावर सर्जरी करणाऱ्यासह इतर डॉक्टरांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे.
या ४० डॉक्टरांच्या थुंकीचे आणि काही ब्लड सॅपल्स तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या ४० पैकी ३० जण हे रुग्णालयातील स्टाफ तर १० डॉक्टरांचा समावेश आहे.या सर्वांचे सॅपल्स पाठवण्यात आले आहेत. त्यांचे रिपोर्ट काय येतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. मात्र एका रुग्णाच्या बेजबाबदारपणाचा फटका ४० जणांना बसला आहे.

