Pune City News
राष्ट्रीय

‘अतिरिक्त बेड, व्हेंटिलेटर तयार ठेवा’: केंद्र सरकार

Pune City News:- केंद्र सरकारने देशातील सरकारी व खासगी रुग्णालयांसाठी एक सूचना जारी केली आहे.
देशातील सर्व खासगी व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांना रुग्णालयात बेड शिल्लक ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विलगीकरण कक्ष, पुरेसे व्हेंटिलेटर, ऑक्सिजन मास व अतिरिक्त मनुष्यबळ यांची तयारी ठेवावी, अशी सूचना दिली आहे.
कोरोना विषाणु बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने वैद्यकीय क्षेत्राला सतर्क केले आहे.
देशात अद्याप सामुदायिक संसर्ग झाला नाही. तरीही खबरदारी म्हणून सर्व वैद्यकीय सुविधा तयार ठेवण्यात येत आहेत. कोरोनावर वैद्यकीय उपचार म्हणून आवश्यक सर्व साहित्यांचा पुरेसा साठा करण्यासाठी केंद्र सरकार कामाला लागले आहे.

Related posts

सुदृढ आरोग्य माणसाचा मूलभूत हक्क; सुप्रीम कोर्ट

Vishal Khandagale

गॅस सिलेंडर महागले

Vishal Khandagale

चीनची भारताला धमकी!

Vishal Khandagale

Leave a Comment