Pune City News:- कोरोना विषाणू चा प्रसार नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना तसेच यंत्रसामग्रीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी ५० लाखांचा विशेष निधी उपलब्ध
करून दिला आहे. यासंबंधीचे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना दिले आहे. आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत सन २०१९-२० व २०२०-२१ मधून कोविड-१९ या विषाणूवर उपाययोजना,
यंत्रसामग्री व सुविधांसाठी हा निधी दिला आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अटी, शती व धोरणानुसार आवश्यक आरोग्य साहित्याची खरेदी तत्काळ करावी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेल्या निर्णयानुसार, आमदार टिंगरे यांनी एका महिन्याचे वेतनही दिले आहे.

previous post

