Pune City News
पुणे

आर्थिक मदतीसाठी सरसावलेले हात कोरोना योद्धाच: पाटील

PUNE CITY NEWS :- कोरोनाच्या लढ्यात जे विविध प्रकारे नागरिक मदत करत आहेत. या लढ्यात आर्थिक मदत करणारे ही एक प्रकारे कोरोना योद्धाच असल्याचे प्रतिपादन भाजप चे प्रदेशाध्यक्ष  आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले.

प्रभाग १३ मधील गिरीजाशंकर विहार सोसायटीच्या वतीने चंद्रकांत पाटील यांना पंतप्रधान निधीसाठी २५,००० हजार तर महापौर मुरलीधर मोहोळ यांना मुख्यमंत्री निधीसाठी २५,००० हजार रुपये मदत निधीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या पुढाकाराने हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. यावेळी नगरसेवक दीपक पोटे, भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, सारंग राडकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

अनेक नागरिक मदतीसाठी पुढे येत आहेत आणि त्यामुळेच कोरोना विरुद्ध ची लढाई आपण लवकरच जिंकू असे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.

गिरीजाशंकर विहार सोसायटीचे अध्यक्ष संजय कबाडे, सचिव रवींद्र गोखले, खजिनदार आनंद शेलार, काशीनाथ पटवेकर, व्यवस्थापन समिती सदस्य अरुण दिघे यांनी हे धनादेश सुपूर्द केले.

Related posts

ताडीवाला रोडला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट !

Vishal Khandagale

पालखी मार्गावरील विठ्ठलाची मूर्ती नागरिकांचे आकर्षण

Vishal Khandagale

पुण्यात पहिल्या खाजगी डॉक्टरचा मृत्यू !

Vishal Khandagale

Leave a Comment