Pune City News
गुन्हे विषयक

उपराष्ट्रपतीं विरोधात आक्षेपार्ह पोस्ट; बारामतीत गुन्हा

PUNE CITY NEWS :- दोन दिवसांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांचा फोटो वापरुन फेसबुक पोस्ट करणाऱ्यावर बारामतीत पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभाविपचे कार्यकर्ते वैभव सोलनकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पुजा झोळ या फेसबुक अकाऊंटवरून ही पोस्ट करण्यात आली असल्याचे वैभव सोलनकर यांनी म्हटले आहे.

यावर बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवि कलम ५०५ (२) प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वैभव सोलनकर यांनी सांगितले की, हा तर लोकशाहीचा अतिरेक झाला आहे. पोस्ट करणारी महिला असून माजी महिला मुख्यमंत्र्यावरती असे स्पष्टीकरण देणे चुकीचे आहे.

Related posts

पेट्रोल पंपावर दारोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पकडले

Vishal Khandagale

लोहगाव परिसरात पुन्हा एकदा पोलिसांना मारहाण !

Vishal Khandagale

राज्य सरकाचा नवा आदेश, 1 एप्रिलपासून सर्व खाती राष्ट्रीयकृत बँकेत

Vishal Khandagale

Leave a Comment