Pune City News
पुणे

ऑक्सीजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत : जिल्हाधिकारी

deshmukh

कोवीड-१९ रुग्णालये आणि कोवीड-१९ हेल्थ सेंटरमधील ऑक्सीजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली.

आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी हे या प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दि.१३ पासून लागू केला आहे.

राज्यात तसेच जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोवीड-१९ रुग्णांना पुरेसा ऑक्सीजन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. राज्यात पुरेसे ऑक्सीजनचे उत्पादन होऊनसुध्दा वितरण योग्य प्रकारे होत नसल्यामुळे काही ठिकाणी तात्पुरता तुटवडा होत असल्याची शक्यता आहे. भविष्यात कोवीड-१९ रुग्णसंख्येत वाढ होईल आणि ऑक्सीजनची गरज वाढेल ही बाब लक्षात घेता ऑक्सीजन पुरवठा सुरळीत होण्याचे दृष्टीने सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हाधिकारी यांनी जिल्हास्तरावर समिती गठीत केली आहे.

पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कंट्रोल रुम दुरध्वनी क्र. २०२-२६१२३३७१ वर संपर्क साधावा. या कंट्रोल रुमला
काही अडचण असल्यास त्यांनी एफडीए कंट्रोल रुम दूरध्वनी क्र.०२२-२६५९२३६४ व टोल फ्री क्र. १८००२२२३६५ संपर्क साधावा. यानुसार समितीने कार्यवाही करुन कोणत्याही रुग्णालयात ऑक्सीजन पुरवठा खंडीत होणार नाही, याची
दक्षता घ्यावी, असेही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

Related posts

राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्नशील -उपमुख्यमंत्री अजित पवार

Vishal Khandagale

‘येस बँक’ निर्बंधमुक्त होणार!

Vishal Khandagale

पुणे शहारातील चार पोलीस ठाण्याच्या हद्दीत “कर्फ्यू” कडक

Vishal Khandagale

Leave a Comment