पुणे

कुटुंबियांसोबत असाल तर मास्कची गरज नाही- महापौर मोहोळ

कौटुंबिक वापराच्या कारमधून प्रवास करणाऱ्यांना मास्क वापरण्याची पालिकेकडून शिथिल करण्यात आली आहे.

त्यामुळे फक्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटारीमध्येच मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य शासनाच्या निदेर्शांनुसार, विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

पालिका आणि पोलिसांकडून एकत्रितपणे ही कारवाई केली जात असून आतापर्यंत दहा कोटींपेक्षा अधिक दंड वसुल करण्यात आला आहे.

दुचाकी चालक, चारचाकी चालक, तीन चाकी आणि पादचाऱ्यांवर कारवाई होत आहे.

या कारवाईला विरोध नसला तरी कारवाईमधून मोटारीला वगळावे अशी मागणी नागरिकांनी केलेली होती. त्या मागणीला न्याय मिळाला असून पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

 

Related posts

48 हजार डोस उपलब्ध ; येथे होणार लसीकरण

Vishal Khandagale

शेतकरी संघटनांचा अंबानी इस्टेटवर मोर्चा धडकणार

Vishal Khandagale

मंत्रालयात सामान्यांना प्रवेश बंद!

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX