Pune City News :- कोरोना; महापालिकेतंर्गत अत्यावश्यक सेवा देणार्या कर्मचार्यांसाठी पीएमपीएलकडून मोफत बस सेवा देण्यात येणार आहे.कर्मचार्यांचे ओळखपत्र तपासूनच बसमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. दररोज सकाळी साडे आठ ते साडे दहा आणि सायंकाळी साडेचार ते साडेसहा या वेळेत दर 30 मिनिटांनी मोफत सेवा देणार आहे आहे.
त्या पार्श्वभूमीवर पीएमपीएलने कात्रज, बालेवाडी, पुणे स्थानक, हडपसर, न ता वाडी आणि स्वारगेट या सहा स्थानकातून बस सोडण्यात येणार आहे.सध्या नागरिकांसाठी अग्निशमन, पोलीस, स्वच्छता, आरोग्य विभागातील कर्मचारी अहोरात्र सेवा देत आहेत.
दरम्यान, कर्मचार्याना बससेवा उपलब्ध करून देणार आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा देणार्या कर्मचार्यांना दिलासा मिळणार आहे.
previous post

