Pune City News
आरोग्यकोरोनामहाराष्ट्र

ब्रेकिंग! राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर

राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात शनिवार आणि रविवारी कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावून लॉकडाऊनबाबत चर्चा केली.

त्यात राज्यात विकेंड लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून लॉकडाऊन सुरू होईल. तो सोमवारी सकाळी संपेल.

दर आठवड्याला शनिवार आणि रविवारी राज्यात कडकडीत बंद राहणार आहे. फक्त यातून अत्यावश्यक सेवा वगळण्या आल्या आहेत.

विकेंड लॉकडाऊन दरम्यान काय बंद राहणार?

● राज्यात विकेंड लॉकडाऊनच्या काळात राज्यातील गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद राहतील.

● तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत.

असा असणार विकेंड लॉकडाऊन?

● उद्या रात्री 8 वाजेपासून नियमावली लागू.
● रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत रात्रीची संचारबंदी.
● सरकारी कार्यालय 50 टक्के क्षमतेनं काम करणार.
● इंडस्ट्री चालू राहणार, कामगारांवर कुठलेही निर्बंध नाही.
● बांधकाम चालू, सरकारी ठेके असलेली कामं सुरु राहणार.
● भाजी मार्केटवर निर्बंध नाहीत.मात्र कठोर निर्बंध.
● सर्व ट्रान्सपोर्ट व्यवस्था सुरु राहणार, मास्क बंधनकारक.
● शुटिंगवर गर्दी होणार नाही तिथे परवानगी, चित्रपटगृहे बंद राहणार.
● मॉल, बार, रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय, डिलिव्हरी सर्व्हिस चालू.
● क्षमतेपेक्षा 50 टक्क्याने सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार.

उद्यापासून काय सुरु आणि काय बंद :

▪️ सर्व उद्योग सुरू राहणार
▪️ सर्व हॉटेल्स आणि मॉल्स बंद
▪️ रेस्टॉरंट फक्त पार्सल सेवा देऊ शकणार
▪️ सर्व बार बंद राहणार
▪️ सर्व धार्मिक स्थळे बंद
▪️ मॉल्स, सिनेमा हॉल, नाट्यगृह, जिम बंद
▪️ सरकारी कार्यालये 50 टक्के क्षमतेत सुरु
▪️ इंडस्ट्री सुरु राहणार, कामगारांवर निर्बंध नाही.
▪️ सरकारी ठेक्यांची कामे सुरु
▪️ सर्व ट्रान्सपोर्ट व्यवस्था सुरु
▪️ बस, रेल्वे, लोकल ट्रेन, टॅक्सी सुरु
▪️ भाजी मार्केट सुरु मात्र, कठोर निर्बंध
▪️ रात्री केवळ अत्यावश्यक सेवा सुरु
▪️ उद्याने आणि मैदाने बंद
▪️ मनोरंजन, सलून्स बंद
▪️ शेतीविषयक कामे सुरु
▪️ रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी
▪️ सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरू
▪️ वित्तीय सेवा सोडून इतर खासगी कार्यालये बंद
▪️ मनोरंजन, सलून्स बंद
▪️ ई कॉमर्स सेवा सुरु
▪️ वृत्तपत्रे छपाई आणि वितरण सुरु
▪️ आजारी कामगाराला काढता येणार नाही

Related posts

मराठा क्रांती मोर्चाचे राज्यभर आंदोलन

Vishal Khandagale

आमदार निवास बॉम्बने उडवण्याच्या फोनमुळे खळबळ

Vishal Khandagale

कोरोना : तीन महिने ईएमआय ची स्थगिती चा सल्ला!

Vishal Khandagale

Leave a Comment