PUNE CITY NEWS :- आपण आतापर्यंत गँगवॉर किंवा तरुणाचे टोळीयुद्ध झाल्याचे आपण अनेकदा पाहतो. हातात तलवारी, बंदूक असे साहित्य घेऊन भांडण झालेली आपण पाहत आलो. मात्र, पुण्यात सध्या एका अशाच भांडणाने चर्चेचा विषय ठरत आहे. ते म्हणजे तरुणींचे भांडण.
पुण्यातल्या डेक्कन परिसरातील लवर्स पॉईंट ठरत असलेल्या नदीपात्रात तरुणींच्या टोळीची भांडण झाल्याची पाहायला मिळाली. या भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
(विडिओ)
या भांडणामध्ये एका तरूणीने दुसऱ्या तरुणीवर दांडक्याने मारहाण करायला सुरुवात केली. तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. असे या व्हिडिओमध्ये पहायला मिळत आहे.
या भांडण करणाऱ्या तरुणी कोण याबाबत आता विचारणा सुरू असून पोलीस प्रशासनालाही याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, या भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

