Pune City News
पुणे

कोरोना प्रतिबंधासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार : जिल्हाधिकारी

राज्य राखीव पोलीस बलातील कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.

दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 ला आज जिल्हाधिकारी राम यांनी भेट देऊन कोरोना परिस्थितीबाबत आढावा घेतला.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) संदीप पाटील, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ७ चे समादेशक श्रीकांत पाठक, गट क्रमांक ५ चे समादेशक तानाजी चिखले, पोलीस उपअधीक्षक ऐश्वर्या शर्मा, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार संजय पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली सोनवणे, नितीन भोसले, वैद्यकीय अधीक्षक संग्राम डांगे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी राम म्हणाले, राज्य राखीव पोलीस बलातील पोलिसांना वैद्यकीय सुविधा देण्यात येणाऱ्या रुग्णालयांना कोणत्याही साधन सामग्रीचा तुटवडा भासू दिला जाणार नाही.

त्यासाठी आवश्यक ती मदत जिल्हा प्रशासन तात्काळ उपलब्ध करून देईल. कोरोना प्रतिबंधाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावांना तात्काळ मान्यता दिली जाईल.

पोलिसांना कोणत्याही कारणाने तब्येतीचा त्रास जाणवला अथवा कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्यास त्यांनी तात्काळ तपासणी करून घ्यावी.

शासकीय अथवा खाजगी रुग्णालयात वैद्यकीय सेवा मिळवून देण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी मदत करेल, असे ते म्हणाले.

Related posts

कुटुंबियांसोबत असाल तर मास्कची गरज नाही- महापौर मोहोळ

Vishal Khandagale

मंगळवार पेठ “Micro Containment Zone” पहा !

Vishal Khandagale

कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी जिल्ह्यात घरोघरी सर्वेक्षणावर भर : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Vishal Khandagale

Leave a Comment