पुणे

प्रयोगशाळांनी नमुना तपासणीचीक्षमता वाढवावी : विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराबरोबरच जिल्हयातील ग्रामीण भागातील रुग्णांच्या नमुना तपासणी करणाऱ्या शासकीय व खाजगी प्रयोगशाळांनी कोविड १९ ची नमुना तपासणीची क्षमता वाढविण्यावर भर द्यावा अशा, सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज दिल्या.

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे येथे विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी भेट देवून कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत संस्थेच्या डॉक्टरांसमवेत आढावा बैठक घेतली.

त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या संचालिका डॉ.प्रिया ॲब्राहम, शीतज्वर विभागाच्या विभागप्रमुख डॉ. वर्षा पोतदार, वैज्ञानिक डॉ. मनोहर चौधरी, डॉ. सुमित भारद्वाज यावेळी उपस्थित होते.

यावेळी म्हैसेकर म्हणाले, जिल्हयातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खासगी आणि शासकीय प्रयोगशाळांमध्ये मोठया प्रमाणात कोविड-१९ नमुना तपासणीसाठी येत असतात त्या नमुना तपासणीचा रिपोर्ट वेळेत प्राप्त होण्यासाठी सर्वांनी प्रयोगशाळांची क्षमता वाढविण्यावर भर द्यावा.

तसेच नमुना तपासणीचे काम करत असतांना योग्य ती दक्षता घेतली गेली पाहिजे. प्रयोगशाळांसाठी पुरेसे मनुष्यबळ, आवश्यक ते वैद्यकीय साहित्य कमी पडत असल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाकडे याबाबत प्रस्ताव सादर करावेत.

आपणास आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्याकरीता प्रशासन सहकार्य करेल, असेही म्हैसेकर यांनी सांगितले आणि आतापर्यंत करण्यात आलेल्या नमुना तपासणीबाबतची माहिती घेतली.

Related posts

खासदारांनी साधला उपेक्षितांशी संवाद

Vishal Khandagale

जम्बो कोविड सेंटरमध्ये सुविधांचा अभाव

Vishal Khandagale

महापौरांनी केले “फिरते विसर्जन हौद” चे उदघाटन……..

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX