Pune City News
पुणे

पुण्यात कंटेन्मेंट झोन वगळून मद्यविक्रीस अखेर अटींसह परवानगी !

Pune City News:- पुणे जिल्ह्यातील अतिसंवेदनशील परिसर वगळून अन्य ठिकाणची मद्यविक्रीची दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्यामुळं पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील इतर ठिकाणी मद्य विक्रीची दुकानं खुली करण्यात येणार आहेत, यासंबंधी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेश दिले आहेत

शहरी भागातील कंटेन्मेंट झोन वगळून घाऊक मद्यविक्रीची दुकाने खुली ठेवता येतील. संध्याकाळी 5 वाजल्यानंतर व्यवहार सुरू ठेवता येणार नाहीत कन्टेन्मेंट झोन वगळता शहरातील स्वतंत्र मद्यविक्रीची दुकाने सुरू ठेवता येतील सीलबंद मद्यविक्री करणाऱ्या दुकानांसमोर पाचपेक्षा जास्त ग्राहक एकाचवेळी असू नयेत. दोन ग्राहकांमध्ये किमान सहा फूट अंतर असणे अनिवार्य, दुकानांसमोर सहा फुटांवर वर्तुळं आखावीत

कामाच्या ठिकाणी सरकारनं जारी केलेली मार्गदर्शक तत्वांचं पालन करणं बंधनकारक दुकानातील सर्व कामगारांची थर्मल स्कॅनिंग करावी.ज्या कामगाराला सर्दी, खोकला, ताप यांसारखी लक्षणं दिसून आल्यास दुकानात प्रवेश देऊ नये घाऊक विक्रेत्यांनी 50 टक्के मनुष्यबळावर व्यवहार सुरू ठेवावेत. सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करावेकिरकोळ मद्यविक्रेत्यांसाठीही अनेक अटी आहेत, सीलबंद  मद्यविक्री  करण्यास परवानगी ग्रामीण भागातील मॉल्स व्यतिरिक्त सर्व दुकाने सुरू करता येतील. शहरी भागात महापालिका व नगरपरिषद हद्दीतील मॉल्स, बाजार संकुलं आणि बाजारांतील मद्यविक्रीची दुकानं खुली ठेवता येणार नाहीत

Related posts

कुठल्याही प्रकारे बेडची कमतरता भासणार नाही -उपमुख्यमंत्री अजित पवार

Vishal Khandagale

येरवडा प्रभाग साठी 300 बेड ची क्षमतेच सुसज्ज कोरेंटल सेन्टर !

Vishal Khandagale

पुणे शहरातील आज दिवस भरातील कोरोना विषयी माहिती

Vishal Khandagale

Leave a Comment