पुणे शहर :- पुणे महानगरपालिकेने ऑक्सिजन जनरेटिंग प्लांटची निर्मिती करत ‘आत्मनिर्भर’ होण्याकडे पाऊल टाकले आहे.
● कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुणे शहरात ऑक्सिजन बेडवरील रुग्णांची संख्या अधिक असल्याने ऑक्सिजनची मागणी अधिक अशी परिस्थिती झाली होती.
● त्यामुळे आता पुणे महापालिका स्वतः दररोज ३० टन ऑक्सिजन तयार करणार असून यासाठी १२ ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट सुरु करण्यात येणार आहे. यातून १०,५८३ लिटर/प्रति मिनिट ऑक्सिजन तयार होईल.
● या निर्णयामुळे आता पुण्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होणार नाही, असे चित्र दिसते आहे.

