Pune City News
पुणे

जम्बो कोविड सेंटरची मुदत संपली – महापौर

अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरची मुदत 28 फेब्रुवारी रोजी संपली आहे.

तसेच गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोरोना रुग्णांच्या प्रमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

त्यामुळे गरज पडल्यास जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू करू, असे मत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

याशिवाय कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी महापालिका प्रशासन जोमाने काम करत आहे.

खाजगी हॉस्पिटलमध्येही बेड्स उपलब्ध व्हावे, यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत आहे.

दररोज सुमारे 700 ते 800 च्या आसपास कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत.

त्यामुळे संख्या वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जास्त प्रादुर्भाव न होऊ देता,सर्वांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.

Related posts

पुणे शहरात येण्यास ” या चार गावांना बंदी

Vishal Khandagale

शनिवारवाडा पर्यटकांसाठी खुला

Vishal Khandagale

पुणे जिल्हाधिकारी कार्यलयात “संविधान दिन” साजरा

Vishal Khandagale

Leave a Comment