राष्ट्रीय

व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीला उच्च न्यायालयात आव्हान !

WHATS APPS

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्संना पॉपअप मेसेज पाठवला असून यामध्ये युजर्संना नियम व अटीसोबत नव्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत सांगितले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप कशा पद्धतीने तुमचा डेटा वापरणार आहे, तसेच व्हॉट्सअ‍ॅपच्या युजसाठी या नियम व अटी अ‍ॅक्सेप्ट कराव्या लागणार आहेत.

जर त्या नियम आणि अटी अ‍ॅक्सेप्ट केल्या नाही तर युजर्सचे अकाऊंट डिलीट केले जाईल असे मेसेजमध्ये म्हटले आहे.

यानंतर अनेकांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या पॉलिसीचा विरोध केला होता. तर अनेकांनी व्हॉट्सअ‍ॅपचा पर्यायही शोधण्यास सुरू केला होता.

दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या पॉलिसीला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या पॉलिसीवर त्वरित स्थगिती आणण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

पेशानं वकिल असेलेल्या चैतन्या रोहिल्ला यांनी दिल्ली उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, कोणत्याही व्यक्तीच्या राईट टू प्रायव्हसी अधिकाराचे हे उल्लंघन असल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

Related posts

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या

Vishal Khandagale

आयआयटी मुंबई देशात अव्वल मात्र जगात…

Vishal Khandagale

कोरोना; कोणत्या राज्यात किती रुग्ण

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX