Pune City News
राष्ट्रीय

सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 5 जवान शहीद*

Pune City News:- जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा सेक्टरमध्ये भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीमध्ये जम्मू-कश्मीर चे पोलीस अधिकाऱ्यासह 4 जवान शहीद झाले आहेत.

हंदवाड सेक्टरमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर भारतीय सैन्यानं हा परिसर घेरला. पोलीस अधिकाऱ्यानं काही दहशतवादी घरामध्ये लपून बसल्याची माहिती दिली होती.

जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं. कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडाच्या चंजमुल्ला भागात दहशतवादी आणि जवान यांच्यात चकमक झाली. यामध्ये चार जवान शहीद झाले.

सुरक्षा दलांनी पराक्रमाची शर्थ करून या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे असल्याचे समजते. चकमकीनंतर स्थानिकांनी जवानांवर तुफान दगडफेक केली.

Related posts

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना राज्याचा दिलासा

Vishal Khandagale

पीएम केअर फंडाचा हिशोब द्या !

Vishal Khandagale

कोरोना; राज्यातील सर्व निवडणुकांना स्थगिती

Vishal Khandagale

Leave a Comment