Pune City News
राष्ट्रीय

दहशतवादी संघटनेच्या टॉप कमांडरचा खात्मा !

Pune City News:- जम्मू-काश्मीरच्या हंदवाड्यात झालेल्या चकमकीत पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर हैदर याचा खात्मा करण्यात आला.याशिवाय, आणखी ठार करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एकाची अद्याप ओळख पटली नाही, असे जम्मू-काश्मीरचे पोलीस अधिकारी विजय कुमार यांनी सांगितले.

या चकमकीत दहशतवाद्यांशी दोन हात करताना लष्कराच्या पाच जणांसह जम्मू काश्मीर पोलीस दलातील एक जण शहीद झाला आहे.दहशतावाद्यांचा सामना करताना हौतात्म्य पत्करलेल्या पाच जणांमध्ये लष्करातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

हंदवाड्यातील एका घरात दोन परदेशी दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर दहशतवादी लपलेले घर जवानांनी स्फोटकांनी उडवून दिले.

या स्फोटानंतर संपूर्ण घराला आग लागली. याशिवाय, या भागात लष्कराने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. संपूर्ण परिसर लष्कराने सील केला.त्यानंतर जवानांकडून घेरले जाताच दहशतवाद्यांनी गोळीबार करत पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना कंठस्नान घालण्यात आले.

Related posts

‘फोर्ब्स’ची 100’ श्रीमंतांची यादी जाहीर; कोरोना लस तयार करणारे ‘हे’ टॉप टेनमध्ये

Vishal Khandagale

‘चला हवा येऊ द्या’ च्या डोक्यात घुसली हवा

Vishal Khandagale

राज्यसभा : गोगोईंनी घेतली शपथ!

Vishal Khandagale

Leave a Comment