Pune City News
पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

दहावीचा शेवटचा पेपर 31 मार्चनंतर ; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Pune City News :- महाराष्ट्रात कोरोना विषाणचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. हा वाढता प्रादुर्भाव पाहता, दहावीचा शेवटचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. खबरादारी म्हणून शाळा, महाविद्यालयांनाही सुट्टी देण्यात आली आहे. याआधी दहावीची परीक्षा वेळेवर होणार असं सांगण्यात आलं होतं. 23 मार्चला होणारा भूगोल विषयाचा पेपर आता 31 मार्चनंतर होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतचा निर्णय घेतला.
याआधी पहिली ते आठवीपर्यंतची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय वर्षा गायकवाड यांनी कालच जाहीर केला होता.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला 3 मार्चपासून सुरुवात झाली आहे. 3 मार्च ते 23 मार्च 2020 या कालावधीत ही परीक्षा नियोजित होती. मात्र राज्यात कोरोनाचं थैमान पाहता, शेवटचा पेपर लांबणीवर टाकला आहे.

Related posts

विधान परिषदेचे 12 जागा साठी मोर्चेबांधणी ..!

Vishal Khandagale

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Vishal Khandagale

ब्रेकिंग! राज्यात आजपासून कडक निर्बंध, राज्य सरकारकडून नवीन नियमावली जारी

Vishal Khandagale

Leave a Comment