Pune City News:- लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचविण्यासाठी तसेच देशाचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आजपासून देशांतर्गत विमानसेवा आजपासून सुरु करण्यात आली आहे.
मुंबईत सुरुवातील दररोज 25 विमानांचं लँडींग आणि तेवढीच विमानं उड्डाण घेणार आहेत.मुंबई रेड झोन मध्ये येत असल्यामुळे येथे विमानसेवा सुरु करण्यात येऊ नये यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुरूवातीला विरोध केला होता.
मात्र हळूहळू जनजीवन पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्य सरकारने ही परवानगी दिली आहे.मुंबईत विमानसेवा पुन्हा सुरु करण्यासाठी महत्त्वाचे नियम घालण्यात आले आहेत.

