Pune City News
राष्ट्रीय

राम मंदिराच्या कामास प्रारंभ…

Pune City News:- राम जन्मभूमी आणि बाबरी मस्जिदचा वाद मिटल्यानंतर अखेर राम मंदिर उभारण्याच्या कामास सुरुवात झाली असल्याची माहिती तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी दिली आहे.

दहा दिवसांपासून अयोध्येतील निश्चित केलेल्या ठिकाणी काम सुरू असून, जागेचे सपाटीकरण करण्यासाठी केलेल्या खोदकामावेळी जुन्या मूर्ती आणि ऐतिहासिक खांब सापडले आहेत.

राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्राने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन केला होता.

या ट्रस्टच्या देखरेखीखाली मंदिराच्या कामाला सुरूवात झाली असून खोदकाम करताना देवीदेवतांच्या मूर्ती, पुष्प कलश, अशा अनेक वस्तुंचे अवशेष सापडले आहेत.दरम्यान, देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने सगळी कामे ठप्प होती, लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात केंद्र सरकारने बांधकामांना परवानगी दिली आहे.

Related posts

कोरोना चा संसर्ग रोखण्यास “पुणे जिल्ह्यात सनियंत्रण आधीकारयाची नेमणूक”

Vishal Khandagale

“काळजी नसावी” शरद पवार

Vishal Khandagale

राफेल लढाऊ विमानांचा भारतीय हवाई दलात समावेश

Vishal Khandagale

Leave a Comment