पुणे जिल्ह्यात “बर्ड फ्लू” चा शिरकाव झाला आहे. पुणे जिल्ह्यातील पहिला विषाणू हा मुळशी तालुक्यामधील नांदे येथे नुकताच आढळून आला आहे.
येथील काही कोंबड्यांचा मृत्यू हा ‘बर्ड फ्लू’ या विषाणूमुळे झाल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाते यांनी दिली आहे.
मुळशी तालुक्यातील सुस-नांदे रस्त्यावर कुटुंबाने कोंबडी पालन व्यवसाय सुरु केलेला आहे. तेव्हा काही दिवसांपूर्वी त्यांच्या या छोट्या पोल्ट्रीतील चार ते पाच कोंबड्या मृत्युमुखी पडल्या होत्या.
परंतु तो प्रकार त्या वरती न थांबता त्यांच्या दररोज चार ते पाच कोंबड्यांचा मृत्यू होऊ लागला. तेव्हा या बाबतीत त्यांना काहीतरी वेगळी शंका वाटू लागली म्हणून पोल्ट्री मालकाने मागील चार दिवसापूर्वीच आपल्या मृत्य कोंबड्याची तपासणी ही औंध येथील प्रयोगशाळेमधड करून घेतली होती.
परंतु दुर्दैवाने त्या तपासणीदरम्यान त्या कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्ल्यू च्या विषाणूमुळे झाला नसल्याचा अहवाल त्यांना आला. मात्र तरीही त्या पोल्ट्रीतील कोंबड्या मरण्याचे न थांबता त्यांच्या मरण्याचे प्रमाण हे वाढतच राहिले.
तेव्हा मात्र त्या मृत कोंबड्याचे आणखी काही नमुने हे तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेकडे पाठविण्यात आले. तर त्याचा अहवाल हा नुकताच रात्री उशिरा आला.

