Pune City News
पुणे

दोन्ही महापालिका व प्रतिबंधित क्षेत्र वगळून उद्योग, कारखाने सुरु करता येणार !

Pune City News:- पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच प्रतिबंधित क्षेत्र वगळून पुणे जिल्ह्यातील सर्व उद्योग, कारखाने, औद्योगिक आस्थापना तात्काळ सुरु करता येतील, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कळविले आहे.

पुणे महानगरपालिका, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आणि प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील उद्योग सुरू करण्यासाठी कोणत्याही औपचारिक परवानगीची, पासेसची गरज नाही, असेही जिल्हाधिकारी राम यांनी स्पष्ट केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील कोणत्याही कामगार किंवा कर्मचाऱ्याला कामावर जाण्याची किंवा प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही. उर्वरित क्षेत्रातील कामगारांनी सोबत आपले ओळखपत्र बाळगावे, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील कामगार किंवा कर्मचारी यांची वाहतूक करण्यासाठी औद्योगिक आस्थापना, उद्योग कारखान्यांनी खास वाहतूक व्यवस्था (डेडीकेटेड ट्रान्सपोर्ट ॲरेंजमेंट) करायला हवी, असेही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले आहे.

Related posts

कोंढवा बुद्रुक “Micro Containment Zone” पहा !

Vishal Khandagale

पुणे शहरात अवकाळीचा तडाखा!

वारजेत ४५ मीटर उंचीच्या राष्ट्रध्वज स्तंभाचे शरद पवारसाहेबांच्या हस्ते अनावरण

Vishal Khandagale

Leave a Comment