पुणेमहाराष्ट्र

सिरम इन्स्टिट्यूटच्या आगीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी 

सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या प्लँटमध्ये लागलेल्या आगीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली.

आग नेमकी कशामुळे लागली या संदर्भात उद्या अत्यंत बारकाईने ऑडिट करण्यात येणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन लागलेल्या आगीच्या दुर्घटनेची माहिती घेतली.

यावेळी आमदार चेतन तुपे, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व वरिष्ठ  पोलिस अधिकारी उपस्थित होते. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी दु:ख व्यक्त केले.

आग आटोक्यात आणण्यासाठी  अग्निशमन दलाचे जवान वेळेत पोहचले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

Related posts

पुणे विभागात 101 रुग्ण पॉझिटीव्ह : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

Vishal Khandagale

मजुरांनी गावाकडे जाण्याचा प्रयत्न करु नये : गृहमंत्री अनिल देशमुख

Vishal Khandagale

पं.भीमसेन जोशी जन्मशताब्दी निमित्त ‘खयाल यज्ञ’ संगीत महोत्सव

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.