Pune City News
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी सही केलेल्या फायलवरील शेराच बदलला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या एका फायलीसोबत छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मुख्यमंत्र्यांनी शेरा दिल्यानंतर तो बदलल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अभियंत्यांविरोधात विभागीय चौकशीचे आदेश दिले होते.

त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेरा देऊन सही केली होती. मात्र, या फायलीवर ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी सही केली होती, त्याच्यावरील मोकळ्या भागात लाल रंगाच्या पेनाने नवीन शेरा लिहला होता. चौकशीनंतर ही फाईल बंद करावी, असा तो शेरा होता.

त्यामुळे अशोक चव्हाण यांना संशय बळावला. त्यांनी पुन्हा चौकशीसाठी ही फाईल पाठवली असता त्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आला.

या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती डीसीपी झोन १ चे शशीकुमार मीणा यांनी दिली.

Related posts

राज्यात 24 तासात 101 पोलीस ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

Vishal Khandagale

कोरोना; महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच !

Vishal Khandagale

सहा दिवसांत पेट्रोल ‘एवढे’ महागले !

Vishal Khandagale

Leave a Comment