Pune City News
गुन्हे विषयक

बांधकाम व्यावसायिकाला पिस्तूलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी !

शुभ ट्रेड बीज इंडिया लिमिटेड या मोठ्या कंपनीत पैसे गुंतवणूक केल्यानंतर सोने आणि चारचाकी वाहन देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाला फसविल्या प्रकरणी शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी संतोष सावंत आणि कंपनीच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिकास पिस्तुल दाखवत धमकावले तर पोलीस कर्मचारी सावंत यांनी पैसे मागितल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली आहे. या गुन्ह्याने शहर पोलीस दलात खळबळ माजली आहे.

याप्रकरणी निखिल मिरगे (वय २९ , रा. नांदेडसिटी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अभिजित धोंडिबा सावंत, शुभ ट्रेड बीज इंडिया लिमिटेड लायबलिटी पार्टनरशिप कंपनीचे संचालक व पोलीस कर्मचारी संतोष सावंत यांच्यावर ४०६ , ४१७ , ४१९ , १२० (ब), ५०६  (२), ३४ सह आर्म ऍक्ट क ३ (२५) यासह महाराष्ट्र राज्यातील गुंतवणूक दरांचे हित संबधाचे सरंक्षण अधिनियम यासह इतर कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. यातील सर्व आरोपींनी आपआपसात संगनमत व कट रचून त्यांच्या शुभ ट्रेड बीज कंपनीत पैसे गुंतवणूक केल्यास महिन्याला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवले. त्यात दुचाकी, कार, सोने यासारखी बक्षीस देऊ असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. तर विश्वास बसवा यासाठी वृत्तपत्र, युट्युब, फेसबुक यासारख्या माध्यमातून जाहिरात केली. त्यानंतर फिर्यादी यांना ६३ लाख रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यातले परतावा म्हणून ३  लाख ७८  हजार रुपये परत दिले. पण नंतर पैसे दिले नाही. फिर्यादी गेले असता त्यांना पिस्तूलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तर यानंतर पोलीस कर्मचारी संतोष सावंत याने फिर्यादी यांच्या दाजीला बोलवून घेत शिवीगाळ करत पैसे मागितल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देत त्यांच्या मर्सिडीजची तोडफोड केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा सर्व प्रकार जुलै २०२०  ते जानेवारी २०२१  या कालावधीत घडला आहे.

Related posts

..म्हणून केली माझ्या नवऱ्याची हत्या

Vishal Khandagale

WhatsApp वर Online हुक्का विक्रीचा पर्दाफाश !

Vishal Khandagale

आलिशान सोसायटीची सुरक्षा करणारा सुरक्षा रक्षकच निघाला चोर !

Vishal Khandagale

Leave a Comment