Pune City News
कोरोनापुणे

नागरीकांसाठी धार्मिक स्थळे बंद

Pune City News :- कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शहरातील पुणे पोलिसांनी शहरातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे नागरीकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.पोलिस सहआयुक्त डॉ.रवीन्द्र शिसवे यांनी सोमवारी याबाबतचा आदेश काढला आहे.23 मार्च पासून ते 31 मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत हा आदेश लागू करण्यात आला आहे.
फौजदारी दंड संहिता कलम 144 अन्वये अंतर्गत हा आदेश देण्यात आला आहे. हा आदेश शहरातील सर्व धर्मीयांना लागू असणार आहे. असे आदेशात स्पष्ठ केले आहे.धार्मिक स्थळावर पारंपरिक पूजा, विधी करण्यासाठी व्यवस्थापनाने नेमलेल्या पुजारी किंवा धर्मगुरुंना परवानगी असणार असल्याचे आदेशात नमुद केले आहे.

Related posts

मंत्रालयात सामान्यांना प्रवेश बंद!

Vishal Khandagale

महापालिका प्रशासन सज्ज; कमला नेहरू रुग्णालयात होणार शुभारंभ

Vishal Khandagale

कोरोना हॉटस्पॉट नसलेल्या भागांना दिलासा !

Vishal Khandagale

Leave a Comment