Pune City News
पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रीय

कोरोना; राज्यातील सर्व निवडणुकांना स्थगिती

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस.मदान यांनी याबाबत माहीती दिली. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोगाला केली आहे.
तसेच मुंबई उच्च न्यायालयाचा 10 ऑगस्ट 2005 रोजीच्या निकालानुसार नैसर्गिक आपत्ती अथवा आकस्मिक परिस्थिती उद्‌भवल्यास निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला आहे.
ही बाब लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने सर्व निवडणुकांशी संबंधित प्रभाग रचना, मतदार यादी व प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम स्थगित केले आहेत,” अशी माहिती मदान यांनी दिली.

“राज्यातील 19 जिल्ह्यांतील 1 हजार 570 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यासाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते.

तसेच औरंगाबाद, नवी मुंबई महानगरपालिका आणि नाशिक, धुळे, परभणी व ठाणे महानगरपालिकेतील प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीकरिता मतदर याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती.

या सर्व कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे,” असं राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस.मदान यांनी स्पष्ट केले.

Related posts

पुणे शहरात भारतातील प्रथम मोबाइल सॅनीटायजेशन युनीट व्हँन

Vishal Khandagale

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवणार; उपमुख्यमंत्री

Vishal Khandagale

पुणे शहर युवक कॉंग्रेस कडून “अर्णब गोस्वामी” विरुद्ध गुन्हा दखल करण्याची मागणी!

Vishal Khandagale

Leave a Comment