राष्ट्रीय

मोदी सरकारचा निर्णय! ‘इतक्या’ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर GST मधून सूट

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अर्थ मंत्रालयाने ४० लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न आणि व्यवसाय करणाऱ्यांना जीएसटीमधून सूट दिली आहे.

ट्वीट : यापूर्वी ही मर्यादा २० लाख रुपये होती. माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या दिवशी अर्थ मंत्रालयाने ट्वीट करुन ही माहिती दिली आहे.

अर्थ मंत्रालयाने म्हटले : “आता ४० लाख रुपयांपर्यंतची वार्षिक उलाढाल असलेल्या व्यवसायांना जीएसटीतून सूट दिली आहे. सुरूवातीला ही मर्यादा २० लाख रुपये इतकी होती.

१.५ कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल असलेले व्यवसाय कंपोजीशन स्कीमची निवड करु शकतात आणि केवळ १ टक्के दराने टॅक्स देऊ शकतात”.

एकदा जीएसटी लागू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात वस्तूंवरील कर कमी केला आहे. आता २८ टक्के टॅक्स स्लॅबमध्ये जवळजवळ फक्त लक्झरीयस वस्तूंचा समावेश आहे.

२८ टक्के टॅक्स स्लॅबमधील एकूण २३० वस्तूंपैकी जवळजवळ २०० वस्तू या लोअर टॅक्स म्हणजेच कमी टॅक्स स्लॅबमध्ये केल्या आहेत. बांधकाम क्षेत्राला, विशेषत: गृहनिर्माण क्षेत्राला दिलासा दिला आहे. त्याचा दर आता ५ टक्के केला आहे”.

Related posts

सुदृढ आरोग्य माणसाचा मूलभूत हक्क; सुप्रीम कोर्ट

Vishal Khandagale

ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना कायमचे वर्क फ्रॉम होम..!

Vishal Khandagale

सीबीआयचे माजी संचालक अश्वनी कुमार यांची आत्महत्या

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX