Pune City News
पुणे

औषध विक्रीसाठी आता वेळ आणि दिवस ….

Pune City News:- पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. रुग्ण सापडण्याचे प्रमाणही वाढत आहे.
अशा परिस्थितीत पुण्यातील घाऊक औषध विक्रीसाठी आता ठराविक दिवस आणि वेळ ठरवून देण्यात आली आहे.

याबाबत पुण्यातील केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.औषध विक्री क्षेत्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

त्याच बरोबर कंपनीच्या प्रतिनिधींनाही घाऊक बाजारात येण्यास मनाई करण्यात आली आहे.त्यामुळे एमआरबरोबर सर्व व्यवहार ऑनलाईन करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे रविवारी ही घाऊक विक्री बंद ठेवण्यात येणार आहे.
मात्र, इतर दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत ही विक्री सुरू राहणार आहे.
त्यामुळे मेडिकल आता सकाळी ११ते दुपारी १ वाजेपर्यंत ठरलेल्या पहिल्या विभागात, त्यानंतर ३ ते ५ या वेळेत दुसरा ठरलेला विभाग आणि संध्याकाळी ५ ते ७ तिसऱ्या विभागात अशा प्रकारे औषध विक्री होणार आहे अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

Related posts

‘महाराष्ट्रात आणखी आठ स्पेशल ट्रेन

Vishal Khandagale

कात्रज “Micro Containment Zone” पहा !

Vishal Khandagale

हाथरस प्रकरणी प्रियंका गांधींचे मोदी सरकारला “पाच प्रश्न”

Vishal Khandagale

Leave a Comment