Pune City News
कोरोनापिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पिंपरी चिंचवड शहरात विद्यार्थ्यांनी केली “होप बॉक्स” पीपीई किटची निर्मिती

PUNE CITY NEWS :- पिंपरी येथील डॉ. डी.वाय.पाटील इन्स्टिट्युट ऑफ फार्मास्युटीकल सायन्सेस अँण्ड रिसर्च महाविद्यालयाचा अंतिम वर्षे औषध निर्माणशास्राचा विद्यार्थी प्रवेश मेहता व त्याचा मित्र श्रेयान्स चोरडिया या विद्यार्थी मित्राच्या सहकार्याने ‘होप बॉक्स’ या नाविण्य पूर्ण पीपीई कीटची संकल्पना तयार करुन उत्पादन करण्यात आले आहे.

त्यास “राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान भारत सरकार” या संस्थेतर्फ या प्रकल्पासाठी अर्थसहाय्य सुद्धा प्राप्त झाले आहे. या संकल्पनेमुळे कोरोना वॉरीअर्स ना संरक्षणासाठी मदत होणार आहे.

सद्यस्थितीला आरोग्य कर्मचारी यांच्यामध्ये कोरोनाचे मोठ्या प्रमाणात संक्रमण होत आहे. ‘द बॉक्स ऑफ होप’ ही नाविण्यपूर्ण संकल्पना रुग्णांपासुन वैद्यकीय कर्मचार्‍यांना कोरोनाचा होणारा संसर्ग कमी करेल.

हे पीपीई पुन्हा वापरण्याजोगे असल्यामुळे, त्याचा पुर्नवापर होईल व प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम टाळता येण्यास मदत होणार आहे.

हे किट डॉक्टर व रुग्णांमध्ये कुंपण बनून राहील. त्यामुळे कोरोना रूग्णांचा थेट संपर्क टाळला जाईल व वैद्यकीय कर्मचार्‍यांचे संक्रमणापासुन संरक्षण करेल.

डॉ. डी. वाय.पाटील रूग्णालय पिंपरी, रुबी हॉल क्लिनिक, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालय औंध, नायडू हॉस्पिटल, यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल पिंपरी, सह्याद्री हॉस्पिटल आदी रुग्णालयांमध्ये वापरासाठी हे किटचे मोफत वाटप करण्यात आले आहे.

Related posts

पुणे महापालिकेने संकटात संवेदनशीलपणे परिस्थिती हाताळली : देवेंद्र फडणवीस

Vishal Khandagale

पुण्यात पहिल्या खाजगी डॉक्टरचा मृत्यू !

Vishal Khandagale

सलग 12 व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ

Vishal Khandagale

Leave a Comment