कोरोनापुणे

पुणे जिल्हाधिकारी व पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्यात समन्वय नाही : जगदीश मुळीक

Pune City News:- पुणे शहरातील कोरोनाची स्थिती हाताळण्यात राज्य सरकार पुर्णत: अपयशी ठरले आहे.याकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या वतीने येत्या शुक्रवारी (ता.२२ मे)सकाळी दहा वाजता भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली.मुळीक म्हणाले,पुणे शहरातील तीन हजार प्रमुख कार्यकर्ते आपआपल्या घराच्या दारात उभे राहून सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पने पालन करून शासनाचा निषेधार्थ फलक प्रदर्शित करणार आहेत.

या कोरोना महामारी ची स्थिती पुणे शहरात निर्माण झाल्यापासून भाजपचे कार्यकर्ते आपत्कालिन व्यवस्थेत मदत आणि विविध प्रकारचे सेवा कार्य करीत आहेत.कोरोना महामारी रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची भाजपची भूमिका आहे. हे सहकार्य यापुढे ही कायम राहील.

तसेच पुण्याचे पालक मंत्री व राज्य सरकारचे पुण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले असून, पुण्यात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहेत. पुणे जिल्हाधिकारी व पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्यात कोणत्याही प्रकारचा समन्वय नाहिये या बेजबाबदार पणाकडे शासनाचे आणि जनतेचे लक्ष वेधणे हा या आंदोलनाचा हेतू असल्याचे मुळीक यांनी सांगितले.ससूनमध्ये दर ४ रुग्णांपैकी एका रुग्णाचा मृत्यू होत आहे.

या वेळी मुळीक म्हणाले, ‘ससून सर्वोपचार हॉस्पिटल मधे कालपर्यंत ४६९ रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत दाखल केलेल्या रुग्णांपैकी ११५ जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच ससूनमध्ये दाखल झालेल्या ४ रुग्णांपैकी एका रुग्णाचा मृत्यू होत आहे.

उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पंजाब, कर्नाटक या देशातील काही मोठ्या राज्यातील मृत झालेल्या व्यक्तिंच्या संख्येपेक्षा ससूनमधील मृतांची संख्या खूप मोठी आहे.

Related posts

अखिल भारतीय अग्रवाल परिषदेच्या अग्रोदय महाअधिवेशनात लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची उपस्थिती

Vishal Khandagale

पुण्याच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून सारंग पाटील यांची माघार…

Vishal Khandagale

बालेवाडीत दसरा चौकात सिलेंडरचा भीषण स्फोट !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX