गुन्हे विषयक

येरवड्यात किरकोळ वादातून खून

Pune City News:- पुण्यातील येरवडा भागात किरकोळ कारणावरून एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला आहे. प्रतीक हनुमंत वन्नाळे (वय 28, रा. पंचशील नगर येरवडा) खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांकडून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी रात्रीच्या सुमारास दोन गटात झालेल्या वादातून एका व्यक्तीवर कुऱ्हाड आणि दगडाने जखमी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावेळी येरवडा पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ येरवडा रवाना झाले. गंभीर जखमी असलेल्या प्रतिकला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले होते. असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Related posts

कोंढव्यात अवैध दारू विक्रेत्याच्या घरात १ कोटी ८५ लाखांची रोकड जप्त !

Vishal Khandagale

डुक्कर खिंड परिसरात भरदिवसा बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार

Vishal Khandagale

युट्युबवर व्हिडीओ पाहून घरीच छापल्या नोटा..

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX