कोरोनापुणे

पुण्यात कोरोनाचा पहिला बळी

Pune City News :- पुण्यात कोरोना विषाणू चा पहिला बळी गेला आहे. कोरोनाबाधित 52 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रुग्णावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील कोरोनाचा हा पहिला बळी ठरला आहे, तर महाराष्ट्रातील कोरोनाबळींची संख्या 9 वर पोहोचली आहे. पुण्यात आज मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णाला विविध व्याधी होत्या. त्यामध्ये त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यात पहिला बळी गेल्याने पुणेकरांसाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

Related posts

काँग्रेस गटनेतेपदी नगरसेवक बागुल यांची निवड

Vishal Khandagale

येरवडा कारागृहात फरशीने हल्ला : एका कैद्याचा मृत्यू, दोन आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल !

Vishal Khandagale

आमदार सुनिल टिंगरे चे केंद्रीय समिती सदस्या सोबत कोरोना बाबत चर्चा!

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX