Pune City News
कोरोनाराष्ट्रीय

लॉकडाऊन वाढवण्याचा विचार नाही!

Pune City News :- देशात कोरोना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवण्यात येणार असल्याच्या सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहेत. मात्र, चर्चा फक्त अफवा असून त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. केंद्र सरकारचा लॉकडाऊन वाढवण्याचा कोणताही विचार नसल्याचे कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी स्पष्ट केले आहे.

◆राजीव गौबा म्हणाले◆ : देशातील लॉकडाऊन वाढवण्यात येणार असल्याच्या चर्चा ऐकून मला आश्चर्य वाटलं. लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याच सरकारचा कोणताही विचार नाही. लॉकडाऊनचा आजचा सहावा दिवस आहे. मात्र, तरीही करोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे 21 दिवसांनंतरही लॉकडाऊन वाढवला जाण्याची चर्चा सर्वत्र आणि समाज माध्यमांमधून सुरु झाली आहे.

आता कॅबनेट सचिवांनीही लॉकडाऊन वाढवण्याचा सरकारचा कुठलाही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Related posts

कोरोनामुळे घरी रुग्ण दगावल्यास पालिकेकडून नवे नियम लागू

Vishal Khandagale

शिवाजीनगर येथे शिबिरात 44 जणांचे रक्तदान

Vishal Khandagale

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना राज्याचा दिलासा

Vishal Khandagale

Leave a Comment