Pune City News
पुणे

पुण्यात “बारामती पॅटर्न” वापरा : अजित पवार

Pune City News:-पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णांची वाढत असलेली संख्या ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे बारामती पॅटर्ननुसार कडक निर्बंध पाळून येथील रुग्णसंख्येला आळा घाला, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवारी) पुणे येथे दिले.

पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली, यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.

या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार सुनील शेळके, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप विष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Related posts

जम्बो कोविड रुग्णालयात आवश्यक सुविधांचे काम सात दिवसात पूर्ण करा; आरोग्यमंत्री

Vishal Khandagale

अभिनेते जयराम कुलकर्णी काळाच्या पडद्याआड

Vishal Khandagale

प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे- पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम

Vishal Khandagale

Leave a Comment