पुणे कॅंटोन्मेंटपुणे शहर

फॅशन स्ट्रीट नुकसानग्रस्तांना शासनाने ५ लाखाची तात्काळ मदत करावी – पदमश्री मिलिंद कांबळे

पुणे कॅम्प :-  फॅशन स्ट्रीट मधील कष्टकरी ,हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना शासनाने तात्काळ पाच लाखाची मदत जाहीर करावी अशी मागणी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री चे संस्थापक अध्यक्ष पदमश्री मिलिंद कांबळे यांनी केली आहे .आज त्यांनी पुणे कॅम्प येथील जळीत ग्रस्त व्यावसायिकांची भेट घेऊन त्या ठिकाणची पाहणी केली .त्यावेळी त्यांनी ही मागणी केली .

पदमश्री मिलिंद कांबळे म्हणाले ;

जिल्हाधिकारी ,पुणे कँटोन्मेंट चे अधिकारी यांनी या ठिकाणची पाहणी करून तत्काळ सरसकट सुरुवातीला ५  लाखाची मदत करावी .आणि त्यांनतर सदरील ठिकाणचा सर्व्हे करावा .कारण या मध्ये सर्व छोटे व्यावसायिक हे कष्ट करून येथे अतिशय प्रामाणिक पणे गेली ३० वर्षापासून व्यवसाय करीत आहेत.पुणे शहरच्या वैभवात भर घालणारा असा फॅशन स्ट्रीट हा भाग आहे. अतिशय माफक दरात आणि अतिशय आधुनिक दर्जाचे कपडे ,महिला युवक आणि सर्वच लोकांना सर्व प्रकारचे वस्तू साहित्य येथे मिळत होते .समाजातील अतिशय गरीब आणि उपेक्षित लोक असून त्यांना न्याय मिळाला पाहिजे .त्यासाठी आपण लवकरच पालकमंत्री अजित पवार ,खासदार गिरीश बापट , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे निवेदन देऊन पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले .

यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी डिक्की चे अविनाश जगताप ,पुणे शहर अध्यक्ष अनिल होवाळे,एन.जी.खरात , मैत्रिय कांबळे यासह दलीत इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्सचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts

पुणे शहरांत “काय सुरू काय बंद” पहा!

Vishal Khandagale

लसीकरणाच्या नियोजनात मोदी सरकारचा मोठा भ्रष्टाचार- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

Vishal Khandagale

विमाननगर मध्ये जम्बो कोविड रुग्णालय सुरू करावे- नगरसेविका श्र्वेता खोसे गलांडे

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX