Pune City News
पुणे

मनपा अधिकारी यांच्या मनोबल वाढविण्यासाठी मानसोपचार तज्ञांचे व्याख्यान !

Pune City News :- कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाय योजना करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी/ कर्मचारी दिवसरात्र प्रचंड तणावाखाली काम करीत आहेत. त्या अनुषंगाने मा.महापालिका आयुक्त शेखर गायकवाड व साखर आयुक्त मा.सौरभ राव यांनी मनपा अधिकारी/कर्मचारी यांचे मनोबल वाढविण्याकरिता मानसोपचार तज्ञांची व्याख्याने आयोजित करणेबाबत सूचित केले होते. त्यानुसार महानगरपालिकेच्या अधिकारी/कर्मचाèयांचे मनोबल वाढविण्याकरिता मानसोपचार तज्ञ निखील वाळकीकर, संस्थापक, अध्यक्ष, मनसृष्टी संस्था, कोथरुड पुणे यांचे मन स्वास्थ्य व ताणतणाव या विषयावर व्याख्यानाचे आयोजन पुणे महानगरपालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आले होते.

सदर प्रसंगी महापौर मा.मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त मा.शेखर गायकवाड, साखर आयुक्त मा.सौरभ राव, अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) मा.रुबल अरवाल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) मा. शान्तनू गोयल, शहर अभियंता प्रशांत वाघमारे तसेच सर्व सहमहापालिका आयुक्त, उपायुक्त, खातेप्रमुख, परिमंडळ आयुक्त, महापालिका सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.

प्रत्यक्षात कोरोना विरोधात लढा सुरु असताना अधिकारी/ कर्मचारी यांच्या मनात विविध तणावात्मक विचार घोळत असताना मला कोरोना होईल काय? या विचारानेही तणाव परिस्थिती मनात निर्माण झालेली आहे.अशा द्विधा तणावाच्या परिस्थितीत मात करण्यासाठी व तणावमुक्त रहाण्याकरिता मन प्रसन्नतेमुळे मात करता येईल असे श्री.निखील वाळकीकर यांनी सांगितले.

Related posts

दीड दिवसांच्या बाप्पाचं आज विसर्जन….

Vishal Khandagale

कोरोनाच्या पाश्वभूमीवर विविध त्रुटी संदर्भात पुणे शहर काँग्रेस पक्षाच्यावतीने विभागीय आयुक्तना निवेदन

Vishal Khandagale

पालखी मार्गावरील विठ्ठलाची मूर्ती नागरिकांचे आकर्षण

Vishal Khandagale

Leave a Comment