Pune City News
पुणे

“महा ई सेवा” चालकांचे सोमवारपासून आंदोलन !

Pune City News:- कोरोना महामारी मुले गेल्या दोन महिन्याच्या अधिक कालावधी पासून सर्व उद्योगधंदे बंद आहेत. त्यातच महा ई सेवा केंद्र चालकांवर यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.उत्पन्नचा मार्ग बंद झाला आहे. वेळोवेळी निधीसाठी पाठ पुरावा करून शासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

त्यामुळे भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अजित संचेती यांनी सोमवारी (दि.२५) मे पासून महाईसेवा केंद्र चालकांना आंदोलनाची हाक दिली आहे.संचेती यांनी महा ई सेवा केंद्र चालकांना स्वत:च्या केंद्राबाहेर उभे राहून आंदोलन करण्याची सूचना केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सरकारकडे केंद्र चालकांच्या उदरनिर्वाह निधीसाठी वेळोवेळी मागणी करून सुद्धा सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे सोमवारी प्रत्येक केंद्र चालकांने आपल्या केंद्रासमोर उभे राहून शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.

Related posts

पुणेकर गिरिप्रेमी जितेंद्र गवारेची एव्हरेस्टवर यशस्वी चढाई

Vishal Khandagale

मुलीच्या वाढदिवशी गरजूना जीवनाश्यक वस्तूचे केले वाटप : यशवंतराव मानखेडकर

Vishal Khandagale

पुण्यात मनसे चा “भाजी बास्केट” उपक्रम

Vishal Khandagale

Leave a Comment