आरोग्यकोरोनापुणे शहर

ससून हॉस्पिटल मधील निवासी डॉक्टर “संपावर” जाण्याचा इशारा !

कोरोना विषाणू च्या प्रादुर्भाव मुळे मागील वर्षभरापासून ही निवासी डॉक्टर कोविड आणि नॉन कोविड रुग्णांसाठी काम करत आहेत. या काळात त्यांना दिले जाणारे इतर प्रशिक्षण हे पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. जर त्यांना इतर प्रशिक्षण मिळाले नाही तर भविष्यात पब्लिक हेल्थ वर याचा परिणाम होईल. अभ्यासाचे एक वर्ष फक्त कोविड ड्युटीमध्ये गेले आहे. वर्षभर आम्ही प्रशासनाला सहकार्य केले आहे. त्यांच्या हातात एका वर्षाचा कालावधी होता. या काळात प्रशिक्षित एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती शक्य होती.

मात्र, प्रशासनाने तसे केले नाही. आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या दुसऱ्या लाटेतही आम्हाला कोविड आणि नॉन कोविड ड्युटी लावण्यात आल्या आहे. त्यामुळे आम्ही शिकायचे कसे आणि काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने लवकरात लवकर आमचे प्रशिक्षण सुरू करावे, अशी मागणी निवासी डॉक्टरांनी केली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत आहे. एकीकडे वाढत असलेली रूग्ण संख्या तर दुसरीकडे कमी पडत असलेली आरोग्य यंत्रणा यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान तयार झाले असतानाच आता निवासी डॉक्टरांचा या मागण्यांमुळे सरकार समोर पुन्हा एकदा अडचण निर्माण झाली आहे.

सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही संपावर जाऊ, अशी भूमिका निवासी डॉक्टरांनी घेतली आहे.

Related posts

शहरात ८३० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Vishal Khandagale

अटींसह मर्यादित उद्योग सुरू करण्यास परवानगी !

Vishal Khandagale

पिंपरी चिंचवड मध्ये ” COVID-19 TEST BUS” दाखल !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.