Pune City News
पुणे

‘भारती’ हॉस्पिटलमध्ये ‘सीरम’च्या लसीची चाचणी

remidi

PUNE CITY NEWS :- संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या ‘ऑक्‍सफर्ड ऍस्ट्राझेन्का’च्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या येत्या दोन दिवसांत पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये सुरू होणार होणार आहेत.

याबाबत या लसीच्या उत्पादनाचे हक्क असणारी सीरम इन्स्टिट्यूट आणि भारती विद्यापीठात करार झाला आहे.

350 स्वयंसेवकांची त्यासाठी निवड करण्यात आल्याची माहिती भारती हॉस्पिटल ऍन्ड रीसर्च सेंटरचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय ललवाणी यांनी दिली.

डॉ. ललवाणी म्हणाले…

चाचणीसाठी सीरम इन्स्टिट्यूटकडून कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस आल्यानंतर ही चाचणी सुरू करण्यात येणार आहे.

साधारण दोन दिवसांत या चाचणीला सुरुवात होणार आहे. 18 ते 99 वयोगटातील व्यक्तींची चाचणी करण्यात येणार आहे.

ज्यांना करोना नाही, त्याची लक्षणे नाही अशा व्यक्तींची ही चाचणी करणार आहे.

तसेच ऍन्टिबॉडीजसह अन्य तपासण्या केल्यानंतरच या लसीची चाचणी करण्यात येणार आहे.

Related posts

खडकवासला साखळी धरणातील वरसगाव धरणही १०० टक्के भरले

Vishal Khandagale

संपूर्ण तालुका क्वारंटाईन(विलींगीकरण)!

Vishal Khandagale

हर्षवर्धन जाधव यांची येरवडा कारागृहात रवानगी

Vishal Khandagale

Leave a Comment